Santosh Deshmukh Case । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालवला जात आहे. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटीकडे सोपवला आहे. मोक्का लावण्याचा निर्णय आरोपींच्या गंभीर गुन्ह्यातील सहभाग आणि संघटित स्वरूपाच्या गुन्ह्याच्या दृष्टीने घेण्यात आला आहे.
Rain Update । सावधान! महाराष्ट्रात थंडीत पावसाची शक्यता, ‘या’ भागांमध्ये सरी बरसणार
संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड ह्या मुख्य मास्टरमाइंडचा समावेश आहे, परंतु त्याला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. हत्येच्या प्रकरणात त्याला अजून अटक झालेली नाही, त्यामुळे त्याच्यावर मोक्का लावलेले नाही. वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे, त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी जोर धरत आहे.
मोक्का हा एक कठोर कायदा आहे, जो गंभीर आणि संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये आरोपींवर लावला जातो. अपहरण, खंडणी, हत्या आणि अमली पदार्थ तस्करीसारख्या गुन्ह्यात मोक्का लागू होतो. मोक्काचे कलम 3(1) नुसार आरोपींना किमान 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि त्यांच्या मालमत्तेची जप्ती देखील केली जाऊ शकते.
Sharad Pawar । शरद पवारांनी दिली मोठी कबुली; म्हणाले, “आपण गाफील राहिलो, संघाच्या प्रचाराचे मोठे यश”