HMPV । सावधान! भारतासाठी धोक्याची घंटा, HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री; आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

HMPV

HMPV । चीनमधून आलेल्या HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण भारतात आढळला आहे. बंगळुरूत एका ८ महिन्याच्या मुलाला या विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. चीनमध्ये HMPV व्हायरस वेगाने पसरत असून, विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांमध्ये हा व्हायरस झपाट्याने फैलावत आहे. आता भारतात याची एन्ट्री झाल्याने देशभर चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे.

Santosh Deshmukh Case । सर्वात मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टरला अटक; आरोपींना पळवण्यास मदत केली

HMPV विषाणूला श्वसनसंस्थेवर परिणाम करणारा आणि संसर्गजन्य आजार मानला जातो. या व्हायरसच्या संदर्भात दिल्लीत आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांमध्ये, इन्फ्लूएंझा-सदृश आजार (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) असलेल्या रुग्णांची माहिती तत्काळ IHIP पोर्टलवर दिली जावी, असे निर्देश रुग्णालयांना दिले गेले आहेत. तसेच, श्वास घेण्यास त्रास असलेल्या किंवा संशयित रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याची आणि योग्य खबरदारी घेण्याची सूचना दिली आहे.

Pune News । पुण्यातील रिक्षाचालकांसाठी नवा नियम, …नाहीतर परवाना होईल रद्द!

HMPV व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी, रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित केली जावी, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. यामध्ये ऑक्सिजन, ब्रॉन्कोडायलेटर्स, पॅरासिटीमोल आणि कफ सिरप यांचा समावेश आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांच्यासमोर लोटांगण घालून पाया पडणार; बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

HMPV विषाणूची लक्षणे ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास, नाक बंद होणे आणि गळ्यात घरघर होणे यांसारखी असतात. हा व्हायरस संपर्कात आल्यावर फैलावतो आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर चिंता निर्माण करू शकतो.

Spread the love