Radhakrishna Vikhe Patil । आत्ताची मोठी बातमी! विखे पाटलांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मिळणार 51 हजारांच बक्षीस; कोणी केली घोषणा?

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil । सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी जालन्याचे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. याला मराठा समाजाचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान मराठा आरक्षणासोबतच धनगर समाज देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर आरक्षणाच्या मागणीवरून शेखर बंगाळे यांनी भंडारा टाकल्याची घटना घडली होती. शुक्रवारी ही घटना घडली होती. (Latest Marathi News)

Congress । काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने केला शिंदे गटामध्ये प्रवेश

यावेळी त्या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये शेखर बंगाळे यांना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाजपच्या शहराध्यक्षांनी मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे धनगर समाजातर्फे तीव्र संताप व्यक्त होत असून धनगर समाज संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharstra Rain Update । मोठी बातमी! गोदावरी नदीला धडकी भरवणारा पूर; मंदिरे, घरे गेली पाण्याखाली…

त्याचबरोबर विखे पाटलांच्या तोंडाला काळे फासणाऱ्या 51 हजार रुपयांचा बक्षीस मल्हार सेनेकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगले तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळणार्या तरुणास मारहाण केल्याप्रकरणी धनगर समाज आक्रमक झाला आहे.

G-20 summit । इंडिया नाही भारतच! G20 परिषदेत नरेंद्र मोदींच्या समोरील फलकावरून चर्चा

Spread the love