Pune Crime । पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत; हातात कोयते घेऊन विद्यार्थ्यांनी केला राडा; पाहा धक्कादायक व्हिडीओ

Pune Crime

Pune Crime । मागील काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गँग (Koyta Gang) राडा करताना पहायला मिळत आहे. यासाठी पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या शक्कल लढवून देखील कोयता गँगला अजून आळा बसलेला नाही. यामुळे आता पुण्याचा बिहार (Bihar) होतोय का? असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये येत आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा कोयता गँगने पुण्यात धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आली आहे.

Narendra Dabholkar । ब्रेकिंग! नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पुणे न्यायालयाचा मोठा निर्णय, 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, 3 निर्दोष

पुण्यात दिघीमध्ये महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या टोळक्यानं हातात कोयता घेऊन जोरदार राडा केला. यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकमेकांना खुन्नस देण्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Accident News । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, ट्रकचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात 3 ठार, 8 जखमी

सोशल मीडियावर व्हिडीओ समोर येताच पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई केली आहे. महाविद्यालय परिसरात हातात कोयता घेऊन राडा घालणाऱ्या चार विद्यार्थ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याचबरोबर घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Ajit Pawar । अजित पवारांच्या निशाण्यावर शिरुरचे आमदार अशोक पवार

Spread the love