Accident News । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, ट्रकचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात 3 ठार, 8 जखमी

Accident News

Accident News । अपघाताच्या (Accident) घटनांनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दररोज कुठे ना कुठे भीषण अपघात होत आहेत. अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. सध्या देखील अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे सगळीकडे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. (Mumbai-Pune Expressway Accident News)

Ajit Pawar । अजित पवारांच्या निशाण्यावर शिरुरचे आमदार अशोक पवार

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर जाणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटले आणि दोन वाहने, एक कार आणि कोंबडीने भरलेल्या टेम्पोला धडक दिल्याने हा अपघात झाला.

Ravindra Dhangekar । रवींद्र धंगेकर यांना मोठा धक्का! अजित पवार गटाने दाखल केली तक्रार; नेमकं प्रकरण काय?

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि मदतीस सुरवात केली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी खोपोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

Pune News । पुण्यात धक्कादायक प्रकार! इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी वसतिगृहातील मुलींचे फोटो तिच्या मित्राला पाठवायची; पुढे घडलं असं की..

Spread the love