Pune Crime । पुण्यात धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुलीसोबत भयानक कृत्य

Pune Crime

Pune Crime । पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. मात्र पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढतच चालले आहे. मागच्या काही दिवसापासून पुण्यात सतत मोठमोठे गुन्हे घडत आहेत. त्याचबरोबर पुण्यामध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचे देखील प्रमाण वाढत आहे. सध्या देखील पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण पुणे हादरले आहे. एका अल्पवयीन मुलीचा नग्न व्हिडिओ शूट करत तिला ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

bjp manifesto 2024 । ब्रेकिंग! भाजपने प्रसिद्ध केला जाहीरनामा; ७० वर्षांवरील लोकांसाठी केली सर्वात मोठी घोषणा

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते याच प्रेम संबंधाचा त्याने गैरफायदा घेतला आणि त्याने अल्पवयीन मुली सोबत भयंकर कृत्य केले आहे. या आरोपीने मुलगी बाथरूम मध्ये गेली असताना काच तोडून तिचा नग्न व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यानंतर तो व्हिडिओ तिला दाखवला आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

Manoj Jarange Patil । ‘या’ तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसणार.. जरांगे पाटील यांनी केली सर्वात मोठी घोषणा

हा नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिचा छळ केला. त्याच्या या छळामुळे आणि धमक्यांमुळे अल्पवयीन मुलगी खूप त्रासली होती आणि या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी अखेर त्या मुलीने तिचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्या मुलीने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने नातेवाईकांमुळे तिचा जीव वाचला आहे. यानंतर हा संपूर्ण घडलेला प्रकार मुलीच्या घरच्यांनी लक्षात घेत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Ajit Pawar । अजित पवारांना सर्वात मोठा धक्का, बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश?

Spread the love