Pune Accident | पुण्यात पुन्हा धक्कादायक अपघात! गर्भवती महिलेला कारने दिली धडक; पाहा थरकाप उडवणार सीसीटीव्ही फुटेज

Pune Accident

Pune Accident | सध्या पुण्यातून एक अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याच्या निघोजमध्ये एक भयानक अपघात घडला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. चारचाकी स्विफ्ट गाडीने गर्भवती महिलेला चिरडलं आहे. पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण ताजे असतानाच आता ही घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

Ajit Pawar । अजित पवारांचे पुणेकरांना मोठे आव्हान; म्हणाले, “घराबाहेर पडू नका..”

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या अपघातात गर्भवती महिला ही जखमी झाली आहे. श्रद्धा येळवंडे असं त्या महिलेचं नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हि महिला गरोदर आहे कारने धडक देताच महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने महिलेच्या पोटातील बाळ हे सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Rain । पुण्यात पावसाचा धुमाकूळ, रवींद्र धंगेकरांनी केले भाजपवर गंभीर आरोप; शेअर केले धक्कादायक व्हिडीओ

याप्रकरणी आता पिंपरी-चिंचवडचे महाळुंगे पोलीस चौकशी करत आहेत. हा अपघात शनिवारी 8 जून रोजी सायंकाळी झाला. दरम्यान, अपघातानंतर कार चालक न थांबताच त्या ठिकाणाहून फरार झाला आहे. सध्या याप्रकरणाचा तपास आता पोलीस यंत्रणा करत आहे.

Devendra Fadnavis । निवडणुकीतील पराभवावर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Spread the love