Pune Rain । पुण्यात पावसाचा धुमाकूळ, रवींद्र धंगेकरांनी केले भाजपवर गंभीर आरोप; शेअर केले धक्कादायक व्हिडीओ

Ravindr Dhangekar

Pune Rain । महाराष्ट्रात मान्सून (Monsoon in Maharashtra) दाखल झाला आहे. राज्यात काही ठिकाणी पाऊसही पडत आहे. पुण्यात मान्सूनपूर्व पावसाने कहर केल्याचं पाहायला मिळाला. पुण्यात रस्त्यावर लोकांच्या घरात सगळीकडे पाणी शिरले आहे. पावसाचा वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला आहे. पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. याचाच धागा पकडत पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपवर निशाणा साधला. 50 वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेल्याचं धंगेकर यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil । मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी पुन्हा सुरु केले उपोषण; विधानसभा निवडणूक लढवणार?

धंगेकर यांनी ट्विट करत लिहिले की, पाऊस झाला मोठा….नालेसफाई घोटाळा झाला खोटा….आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे.सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे.आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला आहे.पुढच्या ५० वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे.प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत.

Devendra Fadnavis । निवडणुकीतील पराभवावर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

पण पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायचा भानगडीत पडू नका,कारण “पाऊसच जास्त झाला” असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे. सुखरूप घरी पोहचा… काळजी घ्या…असे ट्विट काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले आहे. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे.

Pune Rain News । पहिल्याच पावसात पुण्यात धक्कादायक दृश्य, लोकांच्या घरात शिरले पाणी; पाहा धक्कादायक व्हिडीओ

Spread the love