Pune Accident । पुण्यात भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वारांना कारने दिली धडक; एक तरुण ठार, दुसरा जखमी

Pune Accident

Pune Accident । महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे (Ajit Pawar group) आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्याच्या कारने पुणे-नाशिक महामार्गावर दोन दुचाकीस्वारांना चिरडले. यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. ओम सुनील भालेराव असे त्याचे नाव आहे. अन्य तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Accident News । भयानक अपघात! पिकअपच्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

अपघातानंतर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी स्पष्टीकरण देताना त्यांचा पुतण्या मयूर मोहिते अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला नसल्याचा दावा केला आहे. घटनेच्या वेळी आपल्या पुतण्याने कोणत्याही प्रकारचे नशेचे सेवन केले नसल्याचा दावाही आमदाराने केला आहे.

Accident News । पुण्यात मोठा अपघात, प्रवाशांनी भरलेली बस झाडावर आदळली; 25 जण जखमी

स्थानिक लोकांनी आमदाराच्या पुतण्यावर आरोप केला

पुण्यातील पोर्श दुर्घटनेनंतर पुण्यातून दुसरा अपघात समोर आला आहे. पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने त्यांच्या कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. घटना घडली त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदाराचा पुतण्या दारूच्या नशेत होता, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. दारूच्या नशेत त्याने दुचाकीस्वारांना धडक दिली. मयूर मोहिते पाटील यांच्या वैद्यकीय अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bjp । ब्रेकिंग! विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्र्याने सोडला पक्ष

Spread the love