Accident News । पुण्यात मोठा अपघात, प्रवाशांनी भरलेली बस झाडावर आदळली; 25 जण जखमी

Accident news

Accident News । पुण्यात एक मोठी दुर्घटना घडली. येथे प्रवाशांनी भरलेली बस झाडावर आदळली. या अपघातात सुमारे 25 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रकची धडक टाळण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. पुणे राज्य परिवहनची बस सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथून मुंबईकडे जात होती. दौंड तालुक्यातील यवतजवळील सहजपूर गावाजवळ ही घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तीन ते चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Accident News । भयानक अपघात! पिकअपच्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले की, वाटेत अचानक एक ट्रक थांबला आणि धडक टाळण्यासाठी बस चालकाने बस वळवली मात्र बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

NEET-UG Paper Leak । मोठी बातमी! NEET पेपर फुटीप्रकरणी सरकारने घेतला मोठा निर्णय, CBI कडे सोपवला तपास

तीन ते चार जण गंभीर जखमी

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची माहिती देताना अधिकारी म्हणाले की, अपघातात किमान २५ प्रवासी जखमी झाले आहेत. बस झाडावर आदळल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या अपघातात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तेथून जाणाऱ्या लोकांच्या व पोलिसांच्या मदतीने जखमींना बसमधून सुखरूप बाहेर काढून लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Bjp । ब्रेकिंग! विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्र्याने सोडला पक्ष

Spread the love