Prakash Shendge । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! प्रकाश शेंडगेंच्या कारवर चपलांचा हार आणि शाईफेक

Prakash Shendge । राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha) रणधुमाळी सुरु आहे. राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. सांगली लोकसभेचे ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश अण्णा शेंडगे हे उमेदवार आहेत. पण त्यांच्या कारवार अज्ञातांकडून चपलांचा हार आणि शाई फेकण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)

Marathi Serial । आमच्या पप्पांनी गंम्पती आणला फेम साईराज केंद्रे झळकणार आता ‘या’ प्रसिद्ध मालिकेत

प्रकाश शेंडगे यांची रात्री हॉटेल ग्रेट मराठासमोर कार उभी होती. त्यावेळी अज्ञातांनी हा प्रकार केला आहे. कारच्या काचेवर धमकी वजा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जशी नाशिकमध्ये माघार घेतली आहे तशी तुम्ही माघार घ्या. तुम्ही मराठा समाजाच्या नादी लागू नका नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. एक मराठा लाख मराठा असे पत्रक देखील कारच्या काचेवर चिकटवले आहे.

Devendra Fadnavis । राजकरणात मोठी खळबळ! देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार? बड्या नेत्याचा दावा

आता या घटनेमुळे सांगली लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कवठेमहांकाळ तालुक्यातल्या खरशिंग गावात मराठा समाजातल्या तरुणांकडून ही दमदाटी आणि शिवीगाळ केली असल्याचा आरोप देखील प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. याप्रकरणी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, असे प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे.

Ujjwal Nikam । सर्वात मोठी बातमी! पूनम महाजन यांना डावलून भाजपने दिली उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Spread the love