Election 2024 । “विधानसभा निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार वेगवेगळे लढणार”, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Election 2024

Election 2024 । राज्यात लवकरच विधानसभा आणि लोकसभा निवडणुका (Election) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. आगामी निवडणूक यावेळी अटीतटीची असणार आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) वेगवेगळे लढणार आहे,” असा दावा एका बड्या नेत्याने केला आहे. (Latest marathi news)

Pune Crime । पुन्हा दर्शना पवार प्रकरणाची पुनरावृत्ती! प्रेम प्रकरणातून प्रेयसीला झाडल्या गोळ्या

“महाराष्ट्रात अजूनही जागावाटपावरून महाविकास आघाडीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. लोकसभा निवडणुकीत जरी युती, आघाडी झाली तरी विधानसभा निवडणुकीत दोन्ही बाजूने प्रत्येकजण वेगवेगळे लढेल. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपा हेदेखील वेगवेगळे लढतील असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. (Prakash Ambedkar on Election)

Solapur Accident । भीषण अपघात! भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

ते सोलापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “इंडिया आघाडीचे अस्तित्व राहिले नाही. आम आदमी पक्ष बाहेर पडला, टीएमसी बाहेर पडली आणि आता जेडीयू बाहेर पडला. सपा आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. कुठेतरी काँग्रेसनं देखील आत्मपरिक्षण केले पाहिजे,” असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

NCP MLA Disqualification । सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालायने दिला महत्त्वाचा निर्णय

Spread the love