Pune Crime । पुन्हा दर्शना पवार प्रकरणाची पुनरावृत्ती! प्रेम प्रकरणातून प्रेयसीला झाडल्या गोळ्या

Pune Crime

Pune Crime । पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे (Crime in Pune) प्रमाण वाढत चालले आहे. वाढती गुन्हेगारीला आळा बसवणे हे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपूर्वी पुणे शहरात एमपीएससी पास तरुणी दर्शना पवार (Darshana Pawar) हिची हत्या करण्यात आली होती. अशातच आता पुन्हा एकदा प्रेमप्रकरणातून युवतीची तिच्या प्रियकराकडून हत्या झाली आहे. (Latest marathi news)

Solapur Accident । भीषण अपघात! भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका मोठ्या आयटी कंपनीत वंदना द्विवेदी (Vandana Dwivedi) तरुणी अभियंता म्हणून कार्यरत होती. तिची तिच्या गावातील म्हणजे लखनऊमधील युवक ऋषभ निगम (Rishabh Nigam) याच्याशी ओळख होती. दोघांचे काही वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते.पण मागील काही दिवसांमध्ये वंदना आणि ऋषभ यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

NCP MLA Disqualification । सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालायने दिला महत्त्वाचा निर्णय

वंदनाच्या प्रियकराला तिच्याशी लग्न करायचे होते. वंदना सॉफ्टवेअर इंजीनियअर होती आणि ऋषभ ब्रोकर होता. वंदना आपल्याला सोडून जाईल, असे त्याला सतत वाटत होते. त्यामुळे त्याने लॉजमध्ये आपल्या प्रेयसीवर पाच गोळ्या झाडत तिची हत्या करून तो पसार झाला. त्याचा तपास सुरु असताना त्याला मुंबईमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Sharad Mohol Murder । शरद मोहोळ हत्या प्रकरणी समोर आली सर्वात मोठी अपडेट! पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Spread the love