Accident News । उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील मल्लावां पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज (२५ नोव्हेंबर) एक भीषण अपघात घडला. कानपूरहून लग्न समारंभ करुन घरी परतणाऱ्या बोलेरो कारचा भरधाव वेगाने आलेल्या बससोबत धडक झाल्याने या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ४ जण गंभीर जखमी असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवले. बोलेरो कारचा आणि बसचा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी असलेल्या अनेक लोकांच्या मते, कारचा वेग अत्यंत जास्त होता, त्यामुळे हा अपघात झाला.
Uddhav Thackeray । ब्रेकिंग! पराभवानंतर उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठे वक्तव्य, म्हणाले…
दरम्यान, परिसरात या अपघातामुळे तणावाचे वातावरण पसरले आहे. पोलीस आणि प्रशासन या प्रकरणाच्या तपासासाठी तयारी करत आहेत, तसेच पुढील कारवाईसाठी प्राधिकृत अधिकारी घटनास्थळी तात्काळ पोहोचले आहेत. या अपघाताने सर्वत्र शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांचे दु:ख समजून प्रशासनाने त्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे.