
Politics News । माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी नुकताच एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. कडू यांनी म्हटलं की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत जाऊ शकतात. केंद्रात सध्या चालू असलेल्या राजकीय उलथापालथीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा समावेश होईल, असा दावा बच्चू कडू यांनी केला.
Pune Crime l पुणे हादरलं! चाकणमध्ये भरदिवसा गोळीबार, स्टील कंपनी मालक गंभीर जखमी
त्यांनी पुढे सांगितलं की, नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या भाजपसोबत असलेल्या संबंधांचा उदाहरण देताना ते म्हणाले की, ज्या पद्धतीने हे नेते एक दोन बिलांसाठी भाजपसोबत थांबले आहेत, त्याचप्रकारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे देखील भाजपसोबत जाऊ शकतात. कडू यांच्या मते, संजय राऊत यांचे वक्तव्य त्याच दिशेने सूचित करते, कारण सध्या पवार आणि ठाकरे यांच्याकडे असलेल्या खासदारांची संख्या मोठी आहे.
Eknath Shinde । ‘आता एकनाथ शिंदेंना संपवून…’, काँग्रेस नेत्याचं सर्वात मोठं वक्तव्य
कडू यांनी भाजपवरही टीका केली, आणि सांगितलं की भाजपची मोगलाई निती आहे. “जो त्यांच्यापासून लांब जातो त्यांना कापून टाकतात,” असं ते म्हणाले. यासोबतच, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भ्रष्टाचाराच्या विधानावरही त्यांनी टीका केली आणि सांगितलं की, अशा मंत्र्यांचे अभिनंदन करायला पाहिजे.
बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे राज्यात राजकीय चर्चेला आणखी गती मिळाली आहे.
Saif Ali Khan । धक्कादायक! सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर