
Viral Mahakumbh Girl Monalisa । प्रयागराजच्या कुंभमेळ्यात इंदूरची मोनालिसा तिच्या आकर्षक डोळ्यांमुळे आणि लूकमुळे व्हायरल झाली होती. मात्र, आता तिच्या सौंदर्याने तिच्या कुटुंबासाठी मोठं संकट निर्माण केलं आहे. मोनालिसाच्या आजोबांच्या मते, तिच्या प्रसिद्धीमुळे त्यांच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.
Pune Crime l पुणे हादरलं! चाकणमध्ये भरदिवसा गोळीबार, स्टील कंपनी मालक गंभीर जखमी
मोनालिसा मूळची खरगोन जिल्ह्यातील महेश्वरची असून तिचे कुटुंब 35 ते 40 वर्षांपासून महेश्वरमध्ये वास्तव्यास आहे. ते महेश्वर घाटावर हार, रुद्राक्ष मणी आणि पूजेचे साहित्य विकतात. मात्र, मोनालिसा कुंभमेळ्यात प्रसिद्ध झाल्यापासून त्यांचा व्यवसाय प्रचंड प्रभावित झाला आहे. तिच्या सौंदर्याने तिच्या कुटुंबाला चर्चेचा विषय बनवलं असून, लोक तिच्या भोवती फिरत आहेत, त्यामुळे त्या वस्तू विकण्यास अजिबात वेळ मिळत नाही.
Politics News । राजकारणात मोठी उलथापालथ होणार; बच्चू कडूंचा धक्कादायक दावा
मोनालिसाच्या आजोबांनी सांगितलं की, मोनालिसा आणि तिचे कुटुंब प्रयागराजला वस्तू विकण्यासाठी गेले होते. त्यांनी काही वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या होत्या, ज्यामध्ये रुद्राक्ष मण्यांच्या माळा, हार आणि पूजेचे साहित्य समाविष्ट होते. हे सर्व खरेदी करण्यात त्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागले होते. परंतु, मोनालिसाच्या प्रसिद्धीमुळे या वस्तू विकल्या जात नाहीत आणि त्यांचे कर्ज कसे फेडायचं याची चिंता त्यांना सतावत आहे.
Pune Crime l पुणे हादरलं! चाकणमध्ये भरदिवसा गोळीबार, स्टील कंपनी मालक गंभीर जखमी
मोनालिसाच्या आजोबांनी सांगितलं की, “मोनालिसा परत येऊन आमच्या कुटुंबातलीच नॉर्मल लाईफ परत सुरु करायचं सांगत आहे. ती परत जाऊ इच्छित आहे कारण तिच्या सौंदर्यामुळे लोक त्यांच्या व्यवसायाला अवाजवी त्रास देत आहेत.” प्रसिद्धीचा फायदा होण्याऐवजी या कुटुंबाला त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागत आहेत, हे खरंच धक्कादायक आहे.