तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष केसीआर (KCR) हे आषाढी वारीचे औचित्य साधून आपल्या संपूर्ण मंडळासह पंढरपूरला येत आहेत. पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार व्हावा यासाठी त्यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान त्यांचा दौरा अधिकृतपणे निश्चित झाला आहे. यावरून आता त्यांच्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)
बोलताना राऊत म्हणाले की, राज्यात मतांचे विभाजन करण्यासाठी बीआरएस येत आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. केसीआर यांच्या दौऱ्यामागे एक राजकीय कारस्थान आहे. ते अप्रत्यक्षरीत्या भाजप (BJP) पक्षाला मदत करत आहेत, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान आता त्यांच्या या वक्तव्याला भाजप आणि केसीआर कशाप्रकारे उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बजेट ठेवा तयार! बाजारात ‘या’ दिवशी धुमाकूळ घालणार 5-डोर Mahindra Thar, किंमत असणार फक्त..
दरम्यान, केसीआर यांच्या दौऱ्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) मोठा धक्का बसला आहे. राष्ट्र्वादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) हे भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे नाराज असलेले भगीरथ भालके हे राष्ट्रवादीची साथ सोडणार आहेत.
अप्रतिम ऑफर! निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा ‘हा’ सर्वात जास्त विकला जाणारा 5G फोन