लग्नानंतर पत्नीला शिक्षण दिले, अधिकारी बनवले; पण पत्नीने पतीसोबत केले असे काही कृत्य की वाचून तुम्हीही हादराल

Crime News

सध्याचा काळ बदलला आहे. अनेकजण आपल्या पत्नीला लग्नानंतर पुढचे शिक्षण देऊन तिला तिच्या पायांवर उभे करत आहे. असाच काहीसा प्रकार प्रयागराज (Prayagraj) येथे घडला आहे. लग्नानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी असणारे पती आलोक मौर्य यांनी पत्नी ज्योती मौर्यला पीसीएस अधिकारी केले. परंतु अधिकारी झाल्यानंतर पत्नीला दुसऱ्याच पुरुषासोबत संसार थाटायचा होता. लग्नात अडथळा होत असणाऱ्या पत्नीने मग पतीचा काटा काढायचा ठरवले. (Latest Marathi News)

बजेट ठेवा तयार! बाजारात ‘या’ दिवशी धुमाकूळ घालणार 5-डोर Mahindra Thar, किंमत असणार फक्त..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलोक मौर्य यांचा विवाह 2010 साली ज्योतीशी झाला. लग्नानंतर त्यांच्या पत्नीने पुढील शिक्षणाची इच्छा व्यक्त केले. प्रेमापोटी त्यांनीही तिला लग्नानंतर शिकवण्याचे ठरवले. पत्नीने पीसीएसची परीक्षा दिली. 2015 साली त्यांच्या घरात दोन जुळ्या मुली झाल्या. पुढे त्या पीसीएस अधिकारी झाल्या. सगळं काही सुरळीत सुरु असताना 2020 मध्ये मनीष दुबे त्यांच्या नात्यात दुरावा आणला. आलोक मौर्य यांना हे समजताच त्यांनी ज्योतीला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने त्यांचे ऐकले नाही. त्यांनी पत्नीला रंगेहाथ पकडलेही होते. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते.

अप्रतिम ऑफर! निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा ‘हा’ सर्वात जास्त विकला जाणारा 5G फोन

पत्नी ज्योतीला मला मारून दुसऱ्यासोबत संसार करायचा आहे, असा आरोप आलोक मौर्य यांनी केला आहे. तर पीसीएस पत्नीकडून पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर हुंड्याची मागणी तसेच बदनामी आणि छळ केल्याचा आरोप करत धुमणगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी धुमणगंज पोलीस अधिक तपास करत आहेत.

अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद मिळेल का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले; ‘ याचा निर्णय…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *