Amitabh Bachchan । चाहत्यांच्या चिंतेत वाढ! अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan । बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. फक्त देश नाही तर जगभरात त्यांचे खूप चाहते आहेत. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट (Amitabh Bachchan Film) ठरले आहेत. नुकतीच त्यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये (Indian Street Premier League) स्वतःची टीम तयार केली आहे. याबाबत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये काही फोटो पोस्ट देखील केले आहेत. (Latest marathi news)

Bigg Boss 17 । बिग बॉस 17 चा विजेता होणार मालामाल, ट्रॉफी, रोख रक्कमेसह मिळणार ‘हे’ शानदार गिफ्ट

पण त्यांच्या या पोस्टमुळे चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अमिताभ बच्चन यांच्या हाताची शस्त्रक्रिया झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. त्यांनी नुकतेच KBC 15 चं (KBC 15) होस्टींग केलं आहे. इतकेच नाही तर हाताची शस्त्रक्रिया झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगसाठी जाहिरात शूट केली आहे.

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सुर्या (Surya) त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीचं शुटिंग केलं आहे. दरम्यान, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, इंडियन प्रीमियर लीगच्या आधारे तयार केली आहे. या लीगमध्ये अनेक सामने पार पडणार आहेत. यात अनेक स्टार्सनी आपापल्या टीम बनवल्या असून अमिताभ बच्चन हे मुंबई टीमचे मालक आहेत. अक्षय कुमारची टीम श्रीनगर आहे.

Pune Crime । देवदर्शनाला पत्नीला घेऊन गेला अन् २५० फूट खोल दरीत फेकलं; भयानक घटनेने पुणे हादरलं

Spread the love