Petrol Pump Latest News | मोठी बातमी! राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा; सकाळपासूनच ‘नो स्टॉक’चे बोर्ड

Petrol Pump Latest News

Petrol Pump Latest News । हिट अँड रन कायद्यात केंद्र सरकारने बदल केल्यानंतर देशभरातील ट्रकचालक सध्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. ठीक ठिकाणी ट्रक चालक आंदोलन करत आहेत. ट्रक चालकांनी काल मुंबई या ठिकाणी आंदोलन केले यावेळी पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रकचालकांनी पोलिसांना जबर मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहन चालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारला आहे. परिणामी अनेक ठिकाणी अवजड वाहने रस्त्यावरच उभे असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

Bjp । भाजपला मोठा धक्का! स्वतःच्याच आमदाराने दिली 40 हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढण्याची धमकी

वाहने रस्त्यावर उभी असल्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्याचबरोबर भाजीपाला, दूध, फळे यांसारख्या वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर एका रात्रीत झपाट्याने वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. (Breaking News)

Viral News । सर्वात मोठी बातमी! बाजारात मुलाने महिला पोलीस अधिकाऱ्याला मिठी मारली अन् केले किस; पाहा व्हायरल Video

इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारल्याची बातमी समजतात राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी मोठी गर्दी केली होती. पेट्रोल पंपावर दूरच दूर रांगा लागल्या होत्या. पेट्रोल मिळेल की नाही या धास्तीने अनेकांनी वाहनांच्या टाक्या फुल करून घेतल्या आहेत. त्यामुळे आता राज्यातील अनेक जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे सकाळपासूनच पेट्रोल पंपावर ‘नो स्टॉक’चे बोर्ड देखील लागले आहेत.

Nashik News । धक्कादायक! नायलॉन मांजाने गळा चिरडला, ७ वर्षाच्या चिमुकल्याला तब्बल 40 टाके पडले

Spread the love