Ajit Pawar । पाणबुडी प्रकल्पावरून अजित पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Ajit Pawar

Ajit Pawar । महाराष्ट्रामधील अनेक प्रकल्प हे गुजरातला गेले आहेत. यावरून मागच्या काही दिवसापूर्वी चांगलाच गदारोळ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प (Proposed Submarine Project in Sindhudurg District) गुजरातला स्थलांतरित झाल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. “हिसकावून घेऊ नका हे केंद्राला ठामपणे सांगण्याची हिंमत राज्य सरकारमध्ये नाही” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केली होती. यानंतर आता या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Petrol Pump Latest News | मोठी बातमी! राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा; सकाळपासूनच ‘नो स्टॉक’चे बोर्ड

याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “प्रकल्प बाहेर कसे जातील? आम्ही काय आज राज्य चालवतोय का? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही. निवडणुकीच्या दृष्टीने तरुणांमध्ये रोष निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली आहे.

Bjp । भाजपला मोठा धक्का! स्वतःच्याच आमदाराने दिली 40 हजार कोटींचा घोटाळा बाहेर काढण्याची धमकी

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

महाराष्ट्रातील प्रोजेक्ट बाहेर जातील असं कसं होईल? मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकारी गप्प बसतील का? आम्ही काय आज राज्य चालवतोय का? आम्हाला राज्य चालवण्याचा अनुभव नाही का? निवडणुकीच्या निमित्ताने दुसरा काही मुद्दा नाही त्यामुळे तरुणांच्या मनात रोष कसा निर्माण होईल याचा प्रयत्न सुरू आहे. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

Viral News । सर्वात मोठी बातमी! बाजारात मुलाने महिला पोलीस अधिकाऱ्याला मिठी मारली अन् केले किस; पाहा व्हायरल Video

Spread the love