Pankaja Munde । मराठा समाजासाठी कालचा दिवस खूप महत्त्वाचा होता. कारण राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य (Maratha reservation) केल्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते आणि ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. अनेक नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आता आरक्षणाची मागणी मान्य झाल्यावर पंकजा मुंडे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest marathi news)
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षावर भाष्य केलं आहे. ‘एक मराठा लाख मराठा असं म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं. लोकांमधील वितुष्ट कमी करावं, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
Manoj Jarange Patil । ब्रेकिंग! मनोज जरांगे यांची मोठी फसवणूक? झोपेत असताना कागदपत्रांवर घेतली सही?
त्याचबरोबर पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला यामुळे नक्कीच धक्का लागलेला आहे. जे लोक म्हणत असतील ओबीसींना धक्का लागला नाही, तर त्यांनी ओबीसींना समजून सांगावं, नेमका कसा धक्का लागला नाही, अस देखील मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत.
Manoj Jarange । अखेर समोर आली मनोज जरांगे यांच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमागील खरी कहाणी, साडेतीन वाजता…