Manoj Jarange Patil । वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी एक शंका व्यक्त करत म्हटले आहे की, “मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाचा तोडगा निघेल असे कोणतेही चिन्ह दिसत नाही. मनोज जरांगे पाटलांच्या जेवणात जुलाबाचे औषध टाकले जाऊ शकते. त्यामुळे त्यांनी चार जणांमध्ये जेवण न करता पंगतीमध्ये जेवण करावे असा सल्ला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे.
Manoj Jarange Patil । ब्रेकिंग! मनोज जरांगे यांची मोठी फडवणूक? झोपेत असताना कागदपत्रांवर घेतली सही?
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील हजारो मराठ्यांसह मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर धडकले आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण जाण्यास भाजप आणि अजित पवार जबाबदार असल्याचे म्हणत भाजप आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Manoj Jarange । अखेर समोर आली मनोज जरांगे यांच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमागील खरी कहाणी, साडेतीन वाजता…
मराठा समाजाला सरकार चॉकलेट देत आहे. ही गोष्ट मनोज जरांगे पाटील यांना देखील माहित आहे. त्यामुळे सरकारने फसवा फसवी करायला नको. यामुळे हा आरक्षणाचा प्रश्न चिघळेल असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याच्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
Ram Ramdir । पहिल्याच दिवशी भाविकांकडून राम मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधींचं दान, किती आले पैसे?