Manoj Jarange । अखेर समोर आली मनोज जरांगे यांच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमागील खरी कहाणी, साडेतीन वाजता…

Manoj Jarange

Manoj Jarange । मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) निघालेला मराठा मोर्चा लवकरच मुंबईमध्ये धडकणार आहे. आंदोलनामध्ये ठिकठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव जोडले जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाची ताकद अधिकच वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यामुळे सरकारची (State Government) देखील डोकेदुखी वाढली आहे. मराठा वादळ मुंबईत धडकण्याआधीच सरकारने देखील प्रयत्न सुरू केले आहेत. मराठा बांधवांची गर्दी पाहता आज सकाळी मराठा मोर्चा लोणावळ्यात पोहचणार आहे. (Maratha strike)

Ram Ramdir । पहिल्याच दिवशी भाविकांकडून राम मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधींचं दान, किती आले पैसे?

सोशल मीडियावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल (Manoj Jarange Viral Photo) होत आहे. फोटोमध्ये जरांगे पाटील गाडीत झोपल्याचे पाहायला मिळत आहे. कारमधील त्यांच्या सहकाऱ्याने त्यांचं डोकं अलगद धरले आहे. हा फोटो कधी आणि कसा क्लिक झाला असे सवाल निर्माण होत आहे. माहितीनुसार, हा फोटो कटकेवाडीमध्ये असताना क्लिक झाला आहे, असे एका व्हिडिओवरुन दिसून येते. (Maratha reservation strike)

Viral Video । दिल्लीत पाळीव कुत्रा झाला हिंसक, २ वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला, पाहा भयानक व्हिडिओ

“हा व्हिडीओ आमच्या कटकेवाडी चौकामधील असून या चौकामध्ये यायला जरांगे पाटलांना पहाटे साडेतीन वाजले होते. काय म्हणायचं पाटलांच्या सहनशीलतेला,” असे म्हणत प्रसाद देठे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Social Media । सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी महिलेने केले घृणास्पद कृत्य; वाचून व्हाल थक्क

मुंबईत धडकणार वादळ

हे आंदोलन मुंबईत जाईपर्यंत तीन कोटी लोक सहभागी होण्याचा दावा करण्यात येत आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क आहे. मुंबईत लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कायदा सुव्यवस्था, सामाजिक शांतता भंग होण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊनच गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती.

Manoj Jarange । कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगेंचा रात्रभर प्रवास

Spread the love