Palghar Politics News । निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक बडे नेते एकमेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्याचबरोबर काही नेते पक्षांतर करत असल्याचे देखील दिसत आहेत. मागच्या काही दिवसापासून अनेक नाराज नेत्यांनी पक्षांतर केले आहे. उमेदवारी न दिल्याने देखील अनेक नेत्यांनी पक्ष बदलले आहेत. सध्या देखील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
पालघरच्या राजकारणातून बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश सोशल पार पडणार आहे. राजेंद्र गावित यांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
राजेंद्र गावित यांचा थोड्याच वेळात मुंबई पक्षकार्यलयात प्रवेश सोहळा पार पडणार आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित असणार आहेत. यावर्षी पालघरमधून शिवसेनेने उमेदवारी न दिल्यामुळे राजेंद्र गावित नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Mumbai Crime । मुंबई हादरली! लोकल ट्रेनमध्ये बेल्टने मारहाण करून वृद्धाची हत्या