Baramati Lok Sabha Constituency । राजकारणातून मोठी बातमी! बारामतीत पैशांचा पाऊस, पोलिस ‘बंदोबस्तात’ मतदारांना वाटले पैसे; पाहा Video

Baramati

Baramati Lok Sabha Constituency । बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) आज मतदान पार पडत आहे. या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी काटे की टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान यापूर्वी रोहित पवार यांनी ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाट्ल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

Mumbai Crime । मुंबई हादरली! लोकल ट्रेनमध्ये बेल्टने मारहाण करून वृद्धाची हत्या

रोहित पवार यांनी याबाबत ट्विटरवर व्हिडीओ देखील शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस…यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय… यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत… यासाठीच पाहीजे होती का ‘Y’ दर्जाची सुरक्षा”? असं ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

Shreyas Talpade । ‘हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच..’, श्रेयस तळपदेने कोविड लसीवर उपस्थित केले प्रश्न, म्हणाला…

भोर तालुक्यातील हे व्हिडीओ असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर हे पैसे वाटण्यात अजितदादा मित्रमंडळ पदाधिकारी आणि मावळ तालुक्यातील कार्यकर्ते असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. दरम्यान, रोहित पवार यांच्या या आरोपानंतर अजित पवार काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Madhya Pradesh Crime । भीषण घटना! वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्याला ट्रॅक्टरने चिरडलं

Spread the love