Mumbai Crime । मुंबई हादरली! लोकल ट्रेनमध्ये बेल्टने मारहाण करून वृद्धाची हत्या

Mumbai Crime

Mumbai Crime । सध्या मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये एका ५५ वर्षीय व्यक्तीवर बेल्ट आणि चाकूने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. वृद्ध व्यक्ती हळदीच्या कार्यक्रमातून घरी परतत होती. ट्रेनमध्ये त्याचे काही लोकांशी भांडण झाले. मारामारीच्या घटनेत वृद्ध गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत आहे.

Shreyas Talpade । ‘हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच..’, श्रेयस तळपदेने कोविड लसीवर उपस्थित केले प्रश्न, म्हणाला…

ट्रेनमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 एप्रिल रोजी रेल्वेत एका वृद्धाची हत्या झाल्याची घटना समोर येत आहे. या हत्येतील दोन आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Madhya Pradesh Crime । भीषण घटना! वाळू माफियांनी पोलीस अधिकाऱ्याला ट्रॅक्टरने चिरडलं

मुंबईला लागून असलेल्या टिटवाळा आणि वासिंद स्थानकांदरम्यान एका 55 वर्षीय व्यक्तीवर ट्रेनमध्ये हल्ला करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दत्तात्रय भोईर असे मृताचे नाव सांगितले जात आहे. हल्लेखोर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोईर त्याचा मित्र प्रदीप शिरोसे आणि इतर दोघांसोबत उल्हासनगर येथे मित्राच्या हळदी समारंभात सहभागी होऊन घरी परतत होते.

Lok Sabha Election 2024 । ब्रेकिंग! काँग्रेस कार्यालयाबाहेर तोडफोड, १० ते १२ वाहनांची तोडफोड; भाजपवर गंभीर आरोप

Spread the love