एक पाळीव आणि इमानदार प्राणी म्हणून कुत्र्याची ओळख आहे. आपल्या गैरहजेरीत तो आपल्या घराचे रक्षण करत असतो. त्यामुळे अनेकजण कुत्रा पाळतात. परंतु छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे दोन महिलांच्या भांडणात कुत्र्याचा जीव गेल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहे. (Latest Marathi News)
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला धडाकेबाज निर्णय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर येथील दगडगल्ली कुंभारवाडा आवारात घडली आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar Crime News) या दोन्ही महिला एकमेकींच्या शेजारी राहत असून त्यांच्या दोन कुत्र्यांमध्ये भांडण लागले. त्यावरून या दोन महिलांमध्येही वाद सुरु झाला. हा वाद इतका टोकाला गेला की त्यांच्यात हाणामारी झाली.
देवेंद्रजी, तर तुम्हाला शवासन करावं लागणार; उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा
त्यातील एका महिलेने शेजारणीच्या कुत्र्याकडे विटा फेकून मारल्या. त्यामुळे त्या महिलेचा कुत्रा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले, मात्र त्याला मार जास्त लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी त्या महिलेविरोधात सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक फौजदार वाघ करीत आहेत. परंतु, या संपूर्ण घटनेत भांडणात कुत्र्याचा जीव गेल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जातोय.