सध्या विठ्ठलभक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या विठ्ठलभक्तांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. बऱ्याचदा विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीदिवशी पंढरपूरमध्ये जाऊन देखील विठ्ठलाचे दर्शन घेता येत नाही. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी याबाबत एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भक्तांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.
देवेंद्रजी, तर तुम्हाला शवासन करावं लागणार; उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा
विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरु असतानाही वारकऱ्यांना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार असल्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याआधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा सुरु होण्याच्या चार तास आधीच दर्शनाची रांग बंद करण्यात येत होती. त्यामुळे अनेक वारकरी लोकांना विठुरायाचे दर्शन मिळत नव्हते. यामुळे बराच गोंधळ देखील उडायचा. मात्र याच गोष्टीचा विचार करून आता वारकऱ्यांना होणार त्रास टाळण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
हृदयद्रावक! कधीकाळी तमाशाचा फड गाजवणाऱ्या लावणी सम्राज्ञीवर आली भीक मागण्याची वेळ