मागील काही दिवसांपूर्वी दुधाचे दर कमी केल्याने राज्यात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. यावरून सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. अशातच आता राज्य सरकारने (State Govt) पुढाकार घेत खासगी व सहकारी दूध संघांना ३५ रुपये प्रतिलिटर दराने दूध खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या आदेशामुळे पशुपालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (latest Marathi News)
देवेंद्रजी, तर तुम्हाला शवासन करावं लागणार; उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा
पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील(Radhakrishna Vikhe-Patil) यांनी राज्यातील सर्व दुग्ध सहकारी संस्थांची बैठक पुण्यात घेतली. या बैठकीला माजीमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.राज्यातील खासगी व सहकारी दूध संघ शेतकऱ्यांकडून कमी दराने दूध खरेदी करत असतात. त्यामुळे राज्यात दूध खरेदीचा दर समान असावा. दुधाला आता ३५ रुपये लिटर दर देण्यात यावा, अशी बैठकीत चर्चा झाली.
यावेळी माध्यमांशी बोलत असताना विखे म्हणाले की, ‘राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांकडून प्रतिलिटर ३० रुपयांऐवजी हा खरेदी दर कमीत कमी ३५ रुपये प्रतिलिटर इतका करावा, अशी आमची भूमिका आहे. तसेच पशुखाद्यांचेही दर कमी करण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना देण्यात आले आहेत. तसेच दुधात भेसळ करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे भेसळयुक्त दूधाला आळा बसू शकतो, असा दावा विखे यांनी केला.
हृदयद्रावक! कधीकाळी तमाशाचा फड गाजवणाऱ्या लावणी सम्राज्ञीवर आली भीक मागण्याची वेळ