Maratha resevation । मोठी बातमी! ओबीसी संघटनांनी दिले मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान

Maratha resevation

Maratha resevation । राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पण ओबीसी समाजामध्ये (OBC Reservation) नाराजीचे वातावरण पसरले आहे. आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून कडाडून विरोध केला आहे. ओबीसींनी संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी भूमिका घेतली आहे. (Latest marathi news)

Crime News । धक्कादायक! जनगणनेच्या बहाण्याने घरात शिरले आणि चाकूचा धाक दाखवत…

अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांकडून कोर्टात आव्हान दिले आहे. (OBC vs Maratha) ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशनचे ॲड. मंगेश ससाणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून “सगेसोयरे “व” गणगोत “यांच्या प्रतिज्ञा पत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढलेल्या 26 जानेवारी च्या (GR) मसुद्याला ओबीसी संघटनेतर्फे कोर्टात आव्हान दिले आहे.

Ajit Pawar । राज्यसभा निवडणुकीनंतर होणार मोठा भूकंप? अजित पवार गटाने आमदारांना दिल्या ‘या’ सूचना

यावर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे येत्या काळात ओबीसी विरुद्ध मराठा (OBC vs Maratha Strike) ही कायदेशीर लढाई पहायला मिळेल. राज्य सरकार आमच्या वाट्याचं आरक्षण मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न करत आहे, अशी भूमिका घेत छगन भुजबळ यांनी सर्व ओबीसी नेत्यांना एकत्र बोलावत बैठकी घेतली. आता त्यानंतर हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे.

Pankaja Munde । सर्वात मोठी बातमी! पंकजा मुंडे यांना दुखापत, रद्द केले आठवड्याभराचे कार्यक्रम

Spread the love