Solapur Politics News । राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे, सोलापूरच्या राजकारणात हाय व्होल्टेज सामना

Solapur Politics News

Solapur Politics News । सोलापूर : सध्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections) वारे वाहत असून सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. अनेक पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. नुकतीच भाजपने (BJP) महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपने सोलापूरमधून राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Topers Ad

Bjp । भाजपकडून ‘या’ बड्या नेत्याचा पत्ता कट; उमेदवारी देणं टाळलं

पण सोलापूरमधून काँग्रेसने प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे असा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे. तर राम सातपुते हे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. (Praniti Shinde vs Ram Satpute)

Maharashtra politics । ब्रेकिंग! महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट

फडणवीसांचे जवळचे सहकारी म्हणून सातपुते यांची ओळख आहे. नुकतीच राम सातपुते यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर माळशिरस मतदारसंघात मागील पाच वर्षात राम सातपुते यांनी एकतर्फी पकड मिळवली असून विधानसभेत आक्रमक चेहरा म्हणून देखील राम सातपुते यांची ओळख आहे.

Madhya Pradesh । सर्वात मोठी बातमी! उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, पुजाऱ्यासह 13 जण होरपळले

Spread the love