Nilesh Lanke | सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे पीए राहुल झावरे (Rahul Jhaware) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामध्ये राहुल झावरे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Lok Sabha Result । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात काँग्रेसने भाजपला दिला मोठा धक्का
सध्या त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राहुल यांच्यावर हा हल्ला का झाला? हल्लेखोर नेमके कोण आहे. याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. सध्या या प्रकरणाचा पुढीलच तपास पोलीस यंत्रणा करत आहे. पारनेर येथील बसस्थानकासमोर राहुल झावरे यांच्यावर 10 जणांनी प्राणघातक हल्ला केला आहे.
माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या राहुल झावरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लवकरच नगर येथे त्यांना हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.