Nilesh Lanke । निलेश लंकेंच्या भूमिकेवर अजित पवार गटाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले…

Nilesh Lanke

Nilesh Lanke । अहमदनगरच्या पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांच्या गोटात दाखल झालेले नीलेश लंके यांच्या घरवापसीचे वृत्त समोर आले आहे. अजित पवार गटाचे नेते नीलेश लंके शरद पवार गटात सामील होण्याच्या चर्चांनंतर आता अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Bjp । भाजपाला मोठा धक्का! बड्या खासदाराने दिला राजीनामा, करणार कॉंग्रेसमध्ये प्रवेश?

एक गेल्यानं काही फरक पडत नाही. एक गेले तर पाच येतील, असं धर्मराव बाबा अत्राम यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, जर भास्कर जाधव आमच्या गटात आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू. भास्कर जाधव पूर्वी आमच्या पक्षात होते आणि प्रदेशाध्यक्ष देखील होते. ते चांगले नेते आहेत, असं देखील धर्मराव बाबा अत्राम यांनी म्हटलं.

Sharad Pawar । रोहित पवारांच्या ईडी कारवाईवरून शरद पवार कडाडले, केंद्राला आरसा दाखवत घेतला खरपूस समाचार

कोण आहेत नीलेश लंके?

2019 मध्ये नीलेश लंके हे महाराष्ट्रातील पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या जागेवर आमदार म्हणून निवडून आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते लंके हे त्यांच्या मतदारसंघातील सामाजिक कार्य आणि विकासात सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात. शरद पवार यांच्या गटात लंकेचा समावेश झाल्याने अजित पवार यांच्या गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Rinku Rajguru । आर्चीने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव; म्हणाली, “तो सारखा घरी यायचा आणि एकदा…”

Spread the love