Sharad Pawar । रोहित पवारांच्या ईडी कारवाईवरून शरद पवार कडाडले, केंद्राला आरसा दाखवत घेतला खरपूस समाचार

Sharad Pawar

Sharad Pawar । शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मालकीच्या असलेल्या बारामीत अ‍ॅग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून (ED) आता शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना (Kannada Cooperative Sugar Factory) जप्त केला आहे. यावरून खासदार शरद पवार यांनी ईडी आणि केंद्रावर निशाणा साधला आहे. (Latest marathi news)

Rinku Rajguru । आर्चीने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव; म्हणाली, “तो सारखा घरी यायचा आणि एकदा…”

शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “यंत्रणांचा गैरवापर करून टोकाची दहशत निर्माण केली जातेय. इतर राज्यांत मंत्र्यांविरोधात यंत्रणांचा गैरवापर होत आहे. रोहित पवार यांच्या कंपनीवर ईडीची कारवाई चुकीची असून ईडीनं आतापर्यंत ज्या कारवाया केल्या आहेत, त्यापैकी जवळपास 85 टक्के कारवाया या विरोधी पक्षातील नेत्यांवर केल्या आहेत,” असा आरोप शरद पवारांनी केला आहे.

Nilesh Lanke । अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का! आमदार निलेश लंके करणार शरद पवार गटात प्रवेश

“ईडी, सीबीआय किंवा इतर यंत्रणांचा वापर विरोधी नेत्यांना दाबण्यासाठी केला जात आहे. जाणूनबुजून एका सक्रीय कार्यकर्त्याला थांबवण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी कारवाई केली जात आहे. ईडीकडून कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये एकही भाजपचा नेत्याचा समावेश नाही”, असं शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

Lok Sabha Election । अखेर ठरलं! ‘या’ दिवशी जाहीर होणार लोकसभा निवडणुकीच्या तारखा

Spread the love