Nilesh Lanke । निलेश लंकेंनी टाकला मोठा डाव; सुजय विखेंसमोर मोठे आव्हान

Nilesh Lanke Sujay Vikhe Patil

Nilesh Lanke । सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामध्येच अहमदनगर मतदारसंघ देखील चांगला चर्चेत आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी करून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याचबरोबर महायुतीकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये लढत होणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर मधील देखील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Brijbhushan Singh | सर्वात मोठी बातमी! लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या बृजभूषण सिंह यांच्याबद्दल मोठी बातमी समोर

निलेश लंके यांनी मोठा डाव टाकत सुजय विखे यांची कोंडी केल्याची चर्चा सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये आहे. निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. स्वत: लंकेंनी ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. “ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आदरणीय अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन आशीर्वाद घेतले. अण्णांच्या प्रकृतीविषयी चौकशी करत सामाजिक व राजकिय परस्थितीवर चर्चा करण्यात आली”. असे ट्विट नीलेश लंके यांनी केले आहे.

Scorching Heat । सावधान! उष्णतेची लाट येणार…मे महिन्यात आणखी तीव्र उष्णतेची शक्यता; ‘या’ राज्यांना बसेल फटका

अण्णा हजारे यांना मानणारा अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोठा मतदारवर्ग आहे. त्यामुळे निलेश लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन विखे पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असल्याचा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यामुळे ही भेट देखील महत्त्वाची मानली जात आहे.

Yogi Adityanath । सांगलीत योगी आदित्यनाथ कडाडले; म्हणाले, “काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर…”

Spread the love