Brijbhushan Singh | उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून निवर्तमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी भाजपने त्यांचा मुलगा करणभूषण सिंग यांना तिकीट दिले. पक्षाकडून याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नसली तरी, याआधी राष्ट्रीय लोकदलाचे नेते रोहित अग्रवाल यांनी मोठा दावा केला आहे.
रोहित अग्रवाल हे आरएलडीचे प्रवक्ते असून जयंत चौधरी यांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक आहे. कैसरगंज मतदारसंघातून ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापण्यात आल्याचा दावा रोहित अग्रवाल यांनी केला आहे. यासोबतच ते म्हणाले की, आरएलडीने महिलांच्या अस्मितेबाबत दोन आश्वासने दिली होती आणि ती पूर्ण केली आहेत.
Yogi Adityanath । सांगलीत योगी आदित्यनाथ कडाडले; म्हणाले, “काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर…”
आरएलडी नेत्याने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्टमध्ये लिहिले की, “भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता, त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले होते. यावेळी राष्ट्रीय लोकदल महिला कुस्तीपटूंसोबत उभे असल्याचे दिसले. एवढेच नाही तर जयंत चौधरी यांना पाठिंबा देण्यासाठी जंतरमंतरही पोहोचले”.
Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातील मंचावरून जनतेची मागितली माफी; नेमकं काय घडलं?