Nagpur News । मोठी बातमी! मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांनी धडक कारवाई; तिघांना अटक

Masaj Parlar

Nagpur News । अलीकडच्या काळात ब्युटी पार्लर, मसाज पार्लर, स्पा ला जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. तुम्हाला अनेक मसाज पार्लरची (Beauty parlour) दुकाने थाटल्याचे दिसेल. अशातच मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री (Illegal Work) करण्याचे प्रकार देखील घडत आहेत. सध्या देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. याचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याची माहिती समोर आली आहे.

Gujarat Vadodara News । गुजरात दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला! 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सापळा रचत कारवाई करण्यात आली यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मसाज पार्लरवर धाड टाकून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पोलिसांनी या कारवाईतून 4 पीडित मुलींची सुटका केली आहे.

Rajasthan News । धाकट्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून मोठ्या भावाने सोडला जीव; घटना वाचून डोळे पाणी येईल

पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली?

माहितीनुसार, या मसाज पार्लर मध्ये मुलींच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेऊन आरोपींकडून हा देहविक्रीचा व्यापार केला जात होता. आरोपींच्या या कूकृत्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी एक डमी ग्राहक स्पा मसाज सेंटर येथे पाठवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडलं. आणि आरोपीना अटक करण्यात आली आहे.

Ravikant Tupkar । आताच्या घडीची मोठी बातमी! रविकांत तुपकर यांना पोलिसांनी केली अटक

Spread the love