Mumbai hoarding collapse । मुंबईतील होर्डिंग कोसळलेला धक्कादायक व्हिडीओ आला समोर; पाहा Video

Mumbai hoarding collapse

Mumbai hoarding collapse । मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढत आहे. ढिगाऱ्याखालून आणखी दोन जणांचे मृतदेह सापडले असून, त्यानंतर मृतांची संख्या १६ झाली आहे. 13 मे रोजी मुंबईत अचानक आलेल्या वादळामुळे घाटकोपरच्या पंत नगर भागात मोठ होर्डिंग पडले होते. आजूबाजूची अनेक घरे आणि एक पेट्रोल पंप त्याखाली गाडले गेले. या अपघातात मोठ्या संख्येने लोक होर्डिंगखाली गाडले गेले. या दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी मदत आणि बचावकार्य पूर्ण झाले. याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी माहिती दिली.

Bus Accident । ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचा भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी; पाहा video

या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. मात्र सध्या देखील एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. केवळ १७ सेंकदाचा असलेला हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. क्षणात होत्याचे नव्हते झाल्याचे द्दश्य सध्या समोर आलेल्या व्हिडिओतून दिसत आहे. आता या प्रकरणी चौकशी सुरु राहणार आहे.

Milind Deora । काँग्रेस सोडल्यानंतर शिवसेनाच का भाजप का नाही? मिलिंद देवरा यांनी केला मोठा खुलासा

या दुर्घटनेमध्ये NDRF, BPCL, MMRDA, अग्निशमन दल, BMC यंत्रणांचा बचाव कार्यात समावेश होता. या सर्वांनी योग्य पद्धतीने बचावकार्य केल्याची माहिती मुंबई मनपाचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. सध्या बचावकार्य पूर्ण झालंय. दरम्यान या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना सरकारतर्फे मदत देखील जाहीर झाली आहे.

Viral Video । बसमध्ये कपलचे पुन्हा एकदा अश्लील कृत्य; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Spread the love