Darshana Pawar murder case | राजगडाच्या पायथ्याशी MPSC च्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारचा (Darshana Pawar) मृतदेह अर्धवट कुजलेल्या स्थितीत 18 जून रोजी आढळून आला होता. पुढे तपासात तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने संपूर्ण राज्याला हादरून टाकले आहे.
ब्रेकिंग! ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर, मुंबई महापालिकेने केली मोठी कारवाई
या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. (Rahul Handore arrested) मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी राहुलला अटक केली आहे. आता राहुलच्या अटकेनंतर दर्शनाची आई आणि भाऊ यांनी संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी आणखी तीन जणांना अटक!
दर्शना पवार हिच्या आईने आणि भावाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दर्शनाचा भाऊ म्हणाला, “आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाहीतर मारून टाका” अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शनाच्या भावाने दिली आहे. तर माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे आरोपी राहुलचे द्या, अशी प्रतिक्रिया देत दर्शनाच्या आईने संताप व्यक्त केला आहे.