मुंबई । सध्या एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. वॉर्ड क्रमांक 96 जे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांचं हे कार्यालय असून आता कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. हे कार्यालय तोडण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
‘अजितदादांना विरोधीपक्षनेते पद नकोय’; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुमच्या सर्व इच्छा…”
फारूख शेख हे या शाखेचे शाखा प्रमुख आहेत. ही शाखा अनिधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने ही मोठी कारवाई केली आहे. ही शाखा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून खूप जवळ आहे. (Mumbai Municipal Corporation took action against Thackeray group branch in Bandra area of Mumbai)
आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हांडोरेला अटक
हे ही पाहा –