Monsoon Updates । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ भागात हवामान खात्याने दिला पावसाचा इशारा

Monsoon Updates

Monsoon Updates । मान्सून 31 मे या अपेक्षित तारखेपूर्वीच 30 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रात १ जून ते ३ जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनानंतर महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती काय आहे, याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. 1 जून ते 3 जून या कालावधीत मुंबई आणि कोकण वगळता खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Pune Porsche Accident । पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आईबाबत धक्कादायक खुलासा

या भागात पावसाचा इशारा

दरम्यान, येत्या दोन दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यांमध्ये १ जूनपर्यंत आर्द्रता आणि उष्ण वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. खान्देश आणि मराठवाड्यातील 11 जिल्ह्यांमध्ये 30 आणि 31 मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, खान्देशात रात्री उष्णतेची शक्यता आहे. उत्तर-पूर्वेकडील सात राज्यांमध्येही मान्सूनने हजेरी लावली आहे. केरळमध्ये सक्रिय झाल्यानंतर, ते आता कन्याकुमारी, दक्षिण तामिळनाडू, मालदीव आणि लक्षद्वीपचा बहुतेक भाग व्यापत आहे.

Pune Porsche Car Accident । पुणे अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा

मान्सून ईशान्य भारत आणि केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. येत्या दहा दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. नैऋत्य मान्सूनने केरळ आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागांत आज, 30 मे 2024 रोजी प्रवेश केला आहे. कोकणात आज हलक्या पावसाची शक्यता असल्याचे विभागाने म्हटले आहे.

Eknath Shinde । ‘तो’ व्हीडिओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; पाहा Video

Spread the love