Eknath Shinde । ‘तो’ व्हीडिओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; पाहा Video

Eknath Shinde

Eknath Shinde । ४ तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यामुळे सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. यामध्ये अनेक घडामोडी देखील घडत आहेत. सध्या देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स (ट्विटर)वर एक व्हीडिओ शेअर केला आहे. एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळगावी आहेत. त्यांनी त्या ठिकाणी शेतात जात पाहणी करतानाच व्हीडिओ ट्विट केला आहे. हा व्हीडिओ शेअर करताना त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला देखील लगावला आहे.

Mumbai Police । तरुणाने चालत्या गाडीवर केला धोकादायक स्टंट, VIDEO पाहून बसेल धक्का

लोकसभा निवडणूक संपताच लगेच उद्धव ठाकरे ठाकरे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एक व्हीडिओ शेअर करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. परदेशात जाण्यापेक्षा गावाकडे जाऊन थोडं विसावलेलं बरं, असं मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत म्हंटल आहे.

Heat wave | मोठी बातमी! उष्मघाताने 50 पेक्षा जास्त विद्यार्थी बेशुद्ध, धक्कादायक व्हिडीओ समोर

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत लिहिले की, “परदेशी कशाला जायाचं.. गड्या आपला गाव बरा.. शेत पिकाची दुनिया न्यारी.. वसे जिथे विठूरायाची पंढरी… लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते”. असे ट्विट एकनाथ शिंदेनी केलय. सध्या हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे.

Jitendra Awhad । शरद पवार गटनेते जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी; म्हणाले, “चुकून…”

Spread the love