
Ajit Pawar । पुणे अपघात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांची नार्को टेस्ट अर्थात ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी केली दमानिया यांनी केली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांचा फोन जप्त करुन नार्को टेस्ट करा, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. आता या आरोपानंतर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Pune Porsche Accident । पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाच्या आईबाबत धक्कादायक खुलासा
अजित पवार म्हणाले, “माझी नार्को टेस्ट करण्याची कधीपण तयारी आहे. त्या चाचणीत काही आढळलं नाही तर अंजली दमानिया यांनी पुन्हा कुठे पुढे यायचे नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या अजित पवार यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
Pune Porsche Car Accident । पुणे अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा
अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर अंजली दमानिया यांनी देखील अजित पवारांना पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, “मी तुमचं आव्हान स्वीकारत आहे. त्यात तुम्ही दोषी आढळल्यास काय करणार, हे सांगा. तुम्ही दोषी आढळले नाही तर तुमच्या मागणीप्रमाणे मी घरी बसून राहील, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.