Loksabha Election । तरुणाने आठ वेळा केले मतदान, पोलिसांनी केली अटक; ‘या’ ठिकाणी होणार पुन्हा मतदान

Loksabha Election

Loksabha Election । सध्या सगळीकडे मतदान होत आहे. वेगेवेगळ्या राज्यांमध्ये लोकसभेचे मतदान पार पडत आहे. मात्र मतदान पार पडत असतानाच उत्तरप्रदेशमधील एटा जिल्ह्यातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. या ठिकाणी अलीगंज विधानसभेत १३ मे रोजी झालेल्या मतदानानंतर एका अल्पवयीन व्यक्तीने बनावट मतदान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंबाबत शरद पवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

व्हायरल झालेला व्हिडिओ फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातील अलीगंज विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक ३४३ खीरिया पमरनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी एटा जिल्ह्यातील नयागाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

Uddhav Thackeray । “यावेळी भाजप सत्तेत आले तर…”, उद्धव ठाकरेंचा धक्कदायक मोठा दावा

व्हिडिओमध्ये बनावट मतदान करताना दिसणारा तरुण राजन सिंह ठाकूर असून तो खिरिया पमरनचे प्रमुख अनिल ठाकूर यांचा मुलगा असल्याचे सांगण्यात येत आहे. 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी फरुखाबाद लोकसभा उमेदवार मुकेश राजपूत यांना बनावट मतदान करून एका तरुणाने 8 मते दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एटा जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली होती. सध्या या तरुणाला अटक करण्यात आली असून फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

Pune News । पुण्यात मध्यरात्री घडला थरार! मद्यधुंद अवस्थेत बड्या व्यावसायिकाच्या मुलाने गाडीने दोघांना चिरडले

Spread the love