Monsoon 2024 । कडाक्याच्या उन्हात मान्सूनची वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी मान्सूनचे नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस आधी आगमन झाले आहे. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख १ जून आहे. मात्र, एक दिवस अगोदर 31 मे रोजी केरळमध्ये धडकू शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मान्सूनच्या आगमनाने केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे रूपांतर मान्सूनच्या पावसात होणार आहे.
Mumbai Police । तरुणाने चालत्या गाडीवर केला धोकादायक स्टंट, VIDEO पाहून बसेल धक्का
हवामान खात्याचे म्हणणे आहे की नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये प्रवेश केला आहे आणि आज, 30 मे 2024 रोजी ईशान्य भारताच्या बहुतांश भागांकडे सरकणार आहे. हवामानशास्त्रज्ञांनी अलीकडेच ईशान्य भारतात मान्सून लवकर येण्याची शक्यता व्यक्त केली होती. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातून गेलेल्या रामल चक्रीवादळाने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचला असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. यामुळे ईशान्य भारतात लवकरच पाऊस पडू शकतो.
Heat wave | मोठी बातमी! उष्मघाताने 50 पेक्षा जास्त विद्यार्थी बेशुद्ध, धक्कादायक व्हिडीओ समोर
महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून?
अंदमान निकोबार- 22 मे
बंगालचा उपसागर – २६ मे
केरळ, तामिळनाडू – १ जून
कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आसामचा काही भाग – 5 जून
महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा वरचा भाग, पश्चिम बंगाल – 10 जून
गुजरात आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारची सीमा – 15 जून
गुजरातचे अंतर्गत भाग, मध्य प्रदेशचे मध्य भाग आणि उत्तर प्रदेशचे काही भाग – 20 जून
गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर – 25 जून राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब – 30 जून
राजस्थान- 5 जुलै
Jitendra Awhad । शरद पवार गटनेते जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी; म्हणाले, “चुकून…”