
Money Laundering । सध्या मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या जुहू फ्लॅटसह 98 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीने सांगितले की, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या तरतुदींनुसार,राज कुंद्रा यांची 97.79 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.
ही मालमत्ता जप्त करण्यात आली
यामध्ये शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेल्या मुंबईतील पॉश जुहू भागातील एका निवासी फ्लॅटचा समावेश आहे. तसेच पुण्यातील एक बंगला आणि कुंद्राच्या इक्विटी शेअर्सचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त संलग्न केलेल्या मालमत्तेचे/समभागांचे वैयक्तिक मूल्यांकन ईडीने उघड केलेले नाही. (
ED raid on Shilpa Shetty and Raj Kundra
)
ईडीने जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये शिल्पा शेट्टीच्या नावावर मुंबईतील जुहू येथील फ्लॅट आणि राज कुंद्राच्या नावावर पुण्यातील एक बंगला आहे. याशिवाय जप्त केलेल्या मालमत्तेत इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की अंदाजे 97.79 कोटी रुपयांच्या या मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार तात्पुरती संलग्नक आदेश जारी करण्यात आला आहे.