‘१५ ऑगस्ट हा भारताचा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. कारण या दिवशी देशाची फाळणी झाली असल्याने सर्वांनी या दिवशी उपवास करून दुखवटा पाळावा. असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसचे नेते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी’ भिडेंना म्हातार चळ लागलीय’, अशी जहरी टीका केली आहे. (Latest Marathi News)
शिंदे गटाला मोठा धक्का! हायकोर्टाने दिला ठाकरे गटाच्या बाजूने निकाल
संभाजी भिडे यांना वयोमानाप्रमाणे एक तर त्यांना म्हातार चळ लागली असावी किंवा त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असावं. भिडे सारख्या मनोरूग्णांना फक्त वैद्यकीय भाषेत वेढ ठरवण्याचा बाकी आहे. त्यामुळे अशांच्या वक्तव्याकडे काँग्रेस (Congres) अजिबात लक्ष देत नसल्याचे राजू वाघमारे म्हणाले आहेत.
किरण मानेंची ‘त्या’ तरुणांसाठी पोस्ट म्हणाले,’ मर्दुमकी दाखवल्याचा आव आणत…’
तसेच भारताचे स्वातंत्र्य, स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रध्वज यांची निर्भत्सना करणाऱ्या संभाजी भिडे यांचा भाजपने (BJP) जर हिम्मत असेल तर तीव्र निषेध करावा. भाजपने मुळमुळीत शब्दांमध्ये न बोलता भिडेवर त्वरित कारवाई करावी, कारण त्यांचे वक्तव्य देशद्रोहातच मोडणारे आहे. सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असल्याशिवाय त्यांचे असे वक्तव्य करण्याचे धाडस होणार नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.