मोदींना देशाची तर सोनिया गांधी आणि शरद पवारांना स्वतःच्या मुलांची काळजी; बावनकुळे विरोधकांवर बरसले

Bjp

राज्यातील सर्व पक्षांकडून आगामी निवडणुकांची तयारी सुरु आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पाटणा येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हजर राहणार आहेत. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी टीका केली आहे.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! क्रिकेट विश्वावर शोककळा; ‘या’ बड्या खेळाडूच दुःखद निधन

‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावण्याचे काम करत आहेत. त्यांना देशाची चिंता आहे. तर दुसरीकडे विरोधक स्वतःच्या फायद्यासाठी आज पाटणा येथे एकत्र आले आहेत. त्यांना जनतेची नाही तर आपल्या मुलांची काळजी आहे. सोनिया गांधी यांना राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करायचे आहे. शरद पवार यांना सुप्रिया सुळेंची (Supriya Sule) काळजी आहे. तर उद्धव ठाकरे यांना आपल्या मुलाचे भविष्य दिसत आहे,’ असा निशाणा बावनकुळे यांनी ट्विटरवरून साधला आहे.

पशुपालकांना येणार ‘अच्छे दिन’, एक लिटर दुधाला मिळणार आता ‘इतका’ दर; राज्य सरकारने दिले आदेश

त्यामुळे बावनकुळे यांच्या टीकेला विरोधक कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीपूर्वी शरद पवार यांनी आजच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा होणार नसून देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले विहिरीत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *