Milind Deora । शिंदे गटातच प्रवेश का? मिलिंद देवरांची पहिली प्रतिक्रिया समोर

Milind Deora

Milind Deora । लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील बड्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. मिलिंद देवरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. (Milind Deora Resignation from Congress Membership)

Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंच्या मुंबईतील मोर्चाबाबत संभाजीराजेंचे सर्वात मोठे वक्तव्य!

मिलिंद देवरा हे आज आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत दहा माजी नगरसेवक, वीस महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह 450 कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. यावर आता मिलिंद देवरा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी विकासासोबत जात असल्याचं’ त्यांनी म्हटलं आहे.

Accident News । भीषण अपघात! भरधाव दुचाकीने आईसह सहा महिन्याच्या चिमुरड्याला उडवलं

मिलिंद देवरा यांचे ट्विट

आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्याच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे, माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपवत आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. असे ट्विट देवरा यांनी केले आहे. सध्या त्यांचे ट्विट खूप चर्चेत आहे.

Gopichand Padalkar । ‘छगन भुजबळ तुमचा बाप…’, आमदार गोपीचंद पडळकर भडकले

Spread the love